रोज, अगदी पावलोपावली आपण अनेक निर्णय घेत असतो. काही अगदी चटकन घेतो तर काही निर्णयांपर्यंत पोहोचायला आपल्याला खूप वेळ लागतो. कधी आपण अगदी गोंधळून जातो. हे सर्व छोटे मोठे निर्णय आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतात.
निर्णय घेण्याची प्रक्रिया काय असते? हेच निर्णय आपण विवेकनिष्ठ पद्धतीने घेतले तर आपली उद्दिष्ट साध्य करायला मदत कशी होते?. निर्णय चुकतात तेंव्हा काय करायचं ? हेच सर्व शिकूया ‘टू डू ऑर नॉट टू डू ‘ ह्या कार्यशाळेत.
आपल्याला मानसोपचारतज्ञ आणि REBT तज्ञ डॉ. सुखदा अभिराम मार्गदर्शन करतील.
कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने होईल.
नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रज्ञा – ८०८०३ ५९७९४